हृदय हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे. पण खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी, सध्याच्या धकाधकीच्या आणि आधुनिक जीवनशैलीमुळे माणसाच्या शरीराला आजारांनी घेरलेले दिसते. अशा परिस्थितीत डिप्रेशनमुळे माणसाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः डिप्रेशनचा हृदयाच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्या सवयी सुधारून हृदय निरोगी ठेवणे आवश्यक आहे. डॉ. कार्तिक भोसले तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याची काळजी घेऊन तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवता येते.
हृदयासाठी निरोगी पदार्थ खा -
आपले शरीर आणि हृदय जर रोग मुक्त ठेवायचे असेल तर, प्रत्येकाने शरीराला आवश्यक तेवढेच अन्न ग्रहण करणे महत्वाचे असते. कारण कोणाहीती गोष्ट गरजेपेक्षा जास्त केली तर ती आपल्या साठी घातक ठरू शकते. त्याच प्रमाणे जर शरीराच्या गरजेपेक्षा जास्त जेवण केले तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्य वर होतात. म्हणून शरीराला नेहमी आवश्यक तेवढेच आणि हृदयासाठी निरोगी पदार्थ खा.
डॉ. कार्तिक सांगतात कि आपल्या आहारात भाज्या आणि फळांचा जास्त समावेश करा कारण भाज्या आणि फळे हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचे चांगले स्रोत आहेत. तसेच ते कमी कॅलरीज आणि फायबर समृद्ध असतात. भाजीपाला आणि फळे, इतर वनस्पती किंवा वनस्पती-आधारित पदार्थांप्रमाणे, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग टाळण्यास मदत करणारे पदार्थ असतात. अधिक फळे आणि भाज्या खाल्ल्याने तुम्हाला मांस, चीज आणि स्नॅक सारख्या उच्च कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करण्यास मदत होऊ शकते. परिणामी त्याचा तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर चांगला परिणाम होऊन तुमचा शरीर आणि हृदय निरोगी राहते.
धूम्रपान सोडा -
डॉ. कार्तिक भोसले नेहमी सांगतात कि, धूम्रपान करणाऱ्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याचा धोका जास्त असतो. जर तुम्ही धुम्रपान करत असाल, तर तुमच्या आरोग्यासाठी धूम्रपान सोडणे ही सर्वात चांगली आणि महत्वाची गोष्ट आहे. कारण सिगरेट मुळे तुमच्या आरोग्यावर तर वाईट परिणाम होतो त्याच बरोबर त्याचा दुष्परिणाम तुमच्या प्रियजनांना हि भोगावा लागतो. कारण धूम्रपान न करणार्या प्रौढांमध्ये दुय्यम धुरामुळे उद्भवणार्या आरोग्याच्या समस्यांमध्ये कोरोनरी हृदयरोग, स्ट्रोक आणि फुफ्फुसाचा कर्करोग, तसेच स्त्रियांमध्ये प्रजनन आरोग्यावर होणारे प्रतिकूल परिणाम यांचा समावेश होतो, ज्यामध्ये जन्मतः कमी वजनाचा समावेश होतो. म्हणून निरोगी हृदयासाठी धूम्रपान टाळा आणि तुमचा वेळ आणि पैसा तुम्हाला आनंदी, निरोगी आणि जिवंत ठेवणाऱ्या गोष्टींवर गुंतवा.
नियमित व्यायाम करा -
व्यायाम हा आपल्या शरीराला आणि हृदयाला निरोगी ठेवण्याचा सर्वात सोप्पं उपाय आहे. डॉ. कार्तिक भोसले सांगतात कि “सक्रिय जीवन जगणे ही एक सर्वात फायद्याची भेट आहे जी तुम्ही स्वतःला आणि तुमच्या प्रियजनांना देऊ शकता. सोप्या भाषेत सांगायचे तर, रोजच्या शारीरिक हालचालींमुळे तुमच्या आयुष्याची गुणवत्ता वाढते,”
प्रत्येक व्यक्तीने किमान ४५ मिनिटे कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम करणे आवश्यक आहे. तुमचे हृदय हा एक स्नायू आहे आणि कोणत्याही स्नायूप्रमाणेच, व्यायामामुळे तो मजबूत होतो. नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर व हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. व्ययामाने शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते.
तुमचे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित करा -
हृदयविकार आणि स्ट्रोकसाठी उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल हे प्रमुख जोखीम घटक आहे. अनेकांना उच्च रक्तदाबाचा आणि उच्च कोलेस्टेरॉल त्रास होत असतो. डॉ. कार्तिक सांगतात कि, जेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांमधून वाहणारी रक्ताची शक्ती सतत खूप जास्त असते तेव्हा उच्च रक्तदाब असतो आणि त्याचा तुमच्या हृदय, धमन्या आणि किडनीवरील ताण वाढतो. त्यामुळे बऱ्याच आरोग्य समस्या निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही तुमचा रक्तदाब नियंत्रित करणे आवश्यक असते. तसेच कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ आहे. त्याची तुमच्या शरीराला पेशी तयार करण्यासाठी गरज असते. पण जास्त कोलेस्ट्रॉल समस्या निर्माण करू शकते. ते तुमच्या धमन्यांनमध्ये अडथळे निर्माण करतात . आणि त्याचा वाईट परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होत असतो. म्हणून “जेव्हा तुम्ही तुमचे कोलेस्टेरॉल नियंत्रित करता, तेव्हा तुम्ही तुमच्या हृदयाला निरोगी राहण्याची उत्तम संधी देता,”
नियमित आरोग्य तपासणी करा -
डॉ. कार्तिक नेहमी म्हणतात कि, तुमचे शरीर आणि हृदय निरोगी आहे कि नाही हेय जाणून घ्यायचे असेल तर नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते. कारण जर तुमच्या शरीरात एखादा आजार उद्भवत असेल आणि तुम्ही नियमित आरोग्य तपासणी करत असाल तर त्या आजाराची लक्षणे लवकर लक्षात येतील आणि त्यावर योग्य उपचार करणे सोपे जाईल. म्हणून प्रत्येकाने किमान ६ महिन्यातून एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. आणि जे वेगवेळ्या आजाराने ग्रस्त असतात (उदा. मधुमेह) त्यांनी किमान ३ महिन्यातून एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.
या उपायांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करा आणि आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवा. “कोणतीही व्यक्ती हे बदल करू शकते, फक्त पहिले पाऊल उचलणे महत्वाचे असते. म्हणून कोणी तरी म्हंटले आहे,”पहिले पाऊल अन् जबाबदारीची चाहूल.” आपले आरोग्य हे आपल्या पाहत असते. निरोगी राहा आणि आनंदी राहा.!